Marathi Shala – November 7th Session Highlights (शनिवार, ७ नोव्हेंबरचा अहवाल)

आपली Marathi Shala चे ची ७ नोव्हेंबरची सत्र खूप छान पार पडले! एकूण ४६ मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला, आणि प्रत्येक वर्गात शिक्षकांनी मुलांना मराठी भाषेचे सुंदर धडे दिले.
शिक्षकांनी शिकवलेले विषय आणि गृहपाठ दर आठवड्याला ग्रुपमध्ये शेअर केले जातात – कृपया सर्व पालकांनी ते अवश्य पाहावे आणि मुलांना वेळेवर गृहपाठ पूर्ण करण्यास मदत करावी.
या सत्रात मुलांना सहमाही परीक्षेबद्दल (Mid-term Exam) माहिती देण्यात आली.
शिक्षकांनी शिकवलेले विषय आणि गृहपाठ दर आठवड्याला ग्रुपमध्ये शेअर केले जातात – कृपया सर्व पालकांनी ते अवश्य पाहावे आणि मुलांना वेळेवर गृहपाठ पूर्ण करण्यास मदत करावी.
या सत्रात मुलांना सहमाही परीक्षेबद्दल (Mid-term Exam) माहिती देण्यात आली.
📅 सहमाही परीक्षा – डिसेंबर १३, २०२५
🎒 शाळेची सहल (Field Trip) – डिसेंबर २०, २०२५
यानंतर शाळा २०२६ मध्ये पुन्हा सुरू होईल, कृपया ही नोंद घ्यावी.
👉 पुढील महिना आपला Exam Month आहे, त्यामुळे कृपया एकही सत्र चुकवू नका!
🧒 बालमंदिर वर्ग
- प्रार्थना: नियमित प्रार्थना सत्र
- शिकवलेले विषय:
- स्वर आणि व्यंजनांची ओळख: ‘क’ ते ‘ण’ पर्यंत पुनरुच्चार
- गाणी: ये रे पावसा, कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
- शब्दसंग्रह: आत, बाहेर, मागे, पुढे, डावा, उजवा
- पालतू प्राणी परिचय: गाय, ससा, कुत्रा, मांजर
- अंक: १ ते २०
- संभाषण: “तुमचं नाव काय?”, “काय आवडतं?”
- लेखन: अ, आ, इ, उ, क, ग, द, र
- गृहपाठ: शिकलेले स्वर आणि व्यंजन वहीत लिहिणे
🧠 पहिला वर्ग
- प्रार्थना:
- गुरु ब्रह्मा (पान ७)
- वदनी कवळ घेता (पान ८)
- शुभं करोति कल्याणम् (पान ९)
- वाचन सराव: अ ते ज्ञ
- लेखन: क, ख, ग, घ, च, छ, ज, झ
- गृहपाठ (११/१५/२०२५):
1️⃣ क–झ अक्षरे फोटोप्रमाणे वहीत एकदा लिहिणे
2️⃣ ट, ठ, ड, ढ, ण या अक्षरांचे शब्द पान २७ वरून लिहिणे
3️⃣ वाचन: ‘चव’ (पान ५५)
✏️ तिसरी (Tisari) वर्ग
- शिकवलेले विषय:
- स्वर आणि व्यंजनांची पुनरावृत्ती
- संख्या १ ते ५० पर्यंतचा सराव
- काही मुले “क” ते “ज्ञ” पर्यंत व्यंजन वाचत आहेत, काही मुले “क” ते “ढ” पर्यंत, आणि काही “क” ते “श” पर्यंत पोचली आहेत.
- गृहपाठ: दिलेले व्यंजन आणि संख्या पूर्ण करणे.
- पालकांनी आपल्या मुलांना गृहपाठ वेळेत पूर्ण करण्यास मदत करावी. 🙏
📖 चौथी (Chauthi) वर्ग
- प्रार्थना: मनाचे श्लोक आणि पसायदान
- वर्गाचा उत्साह: मुलांचा मराठी शिकण्याचा उत्साह कायम दिसत आहे!
- शिकवलेले विषय:
- ५१ ते १०० संख्या आणि त्यांची बेरीज (Addition)
- आगामी सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजावला गेला
- गृहपाठ:
- पुस्तकातील परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पेपरचे स्वरूप तपासणे
- सरावासाठी संख्या आणि बेरीजचे प्रश्न सोडवणे
सर्व मुलांचा सहभाग आणि पालकांचा सहकार्य पाहून आम्हाला खूप आनंद झाला.
डिसेंबर महिन्यातील परीक्षा आणि सहलीसाठी सर्वांनी तयारीत रहावे.
मराठी शिकणे म्हणजे फक्त भाषा नव्हे तर संस्कृती, विचार आणि आपली ओळख —
आपल्या सर्वांच्या सहभागामुळेच ही शाळा आणखी उजळत आहे. 🌷
– MH Marathi Shala Team
📍 Mountain House | Manteca
🌐 www.mhshala.org
More from the blog

Marathi Sahityavar Charcha
A New Literary Initiative by Aapli Marathi Shala & Community Marathi Sahityavar Charcha Introducing “ आपली बोली” नमस्कार मंडळी, आपल्या Aapli Marathi Shala & Community मध्ये एक…
Read more
चहा आणि गप्पा” – More Than Just Tea, It’s a Movement!
चहा आणि गप्पा More Than Just Tea, It’s a Movement! Hello Marathi Shala Community, I’m excited to share my reflection on the very first day of our “चहा आणि गप्पा” initiative. Going…
Read more
Essay & Letter Writing Contest 2026
Celebrating Creativity, Expression & Heritage! Essay & Letter Writing Contest 2026 FREE EVENT Marathi Shala & Community is excited to announce one of our most cherished annual…
Read more